प्रेमात तर नाही ना…?

अष्टांग हृदयचं लेक्चर चालू असताना त्याच्याकडे मी हळूच पाहिलं आणि माझ्या अंगातलं हृदय अगदी जोराने धडधडू लागलं.. !!
ईशsss…!! अय्या !!
मी लाजतेय…! कसं शक्य आहे ?? तू त्याच्या प्रेमात तर नाही ना..? गप ना ग नेहा उगाच काहीतरी माझ्या डोक्यात भरवू नको(स्वतःशीच बोलते)..!! प्लिझंच हा…! ☺☺
बरं!! नेहा !! आता बस झालं ..आता लेक्चरकडे लक्ष दे.
(थोडा वेळ जातो आणि ती पुन्हा त्याचकडे पाहते)
काय होतंय नेहा तुला? ठीक आहेस ना?.
हो मी ठीक आहे आणि मी प्रेमात वगैरे नाही काय त्याच्या….!!

इतक्यात एक वाऱ्याची झुळूक त्याच्याकडून आली आणि जणूकाही त्यानेच स्पर्श केला अस सांगून गेली..! विद्युत स्पर्श आणि प्रेमळ हर्ष झाला आणि माझी मी राहिलीच नाही..!!
पुन्हा पुन्हा त्याच्याकडेच माझं मन धावत होतं..!
तो लेक्चर अगदी कान देऊन ऐकत आणि मी मात्र त्याच्याकडे हृदय देऊन त्याच्या हृदय स्पदनांना ऐकण्याचा प्रयत्न करत होते..!
सरांनी त्याला उभं केलं आणि विचारलं सांग रे अष्टांग हृद्ययाची आठ अंगे सांग…??
तो काही तरी वेगळं सांगत होता आणि मला काहीतरी वेगळंच सांगत होता..

१ नेहा
२ तुझ्यावर
३ माझं
४ अगदी
५ मनापासून
६ खूप
७ प्रेम
८ आहे..

असा झाला माझ्या प्रेमाचा श्री *गणेशा*

©समीर गुडेकर

😃😃😃😃😃😃😃😍😍

💝============================💝

By:

Posted in:


Leave a comment

Website Powered by WordPress.com.